🌟पहिल्यांदाच महत्त्वाच्या विधिमंडळ उपविधान समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची निवड🌟
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची महाराष्ट्र विधिमंडळ उपविधान समितीच्या प्रमुखपदी विधानसभा अध्यक्षांनी नियुक्ती केली आहे विधिमंडळ उपविधान समितीमध्ये १४ आमदार सदस्यांचा समावेश आहे तीन वेळा आमदार असतानाही चिखलीकर यांची पहिल्यांदाच समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
मागील काळात दोन वेळा आमदार असताना देखील प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कोणत्याही समितीच्या प्रमुखपदी वर्णी लागली नव्हती फक्त लोकलेखा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली होती. पहिल्यांदाच महत्त्वाच्या विधिमंडळ उपविधान समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची निवड झाली आहे. या समितीच्या प्रमुख पदाशिवाय आमदार वेतन व भत्ते समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. या समितीच्या प्रमुखपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपविधान समितीच्या प्रमुखपदी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर तर सदस्यपदी आ.रवी पाटील,आ.सुधीर गाडगीळ,आ.संजय पुराम,आ. किशोर जोरगेवार,आ. जितेश अंतापुरकर,आ.राघवेंद्र पाटील,आ. अनुराधा चव्हाण,राजेंद्र गावित,आ.दिलीप लांडे,आ. राजेंद्र पाटील यड्रावकर,आ.चंद्रकांत नवघरे,आ.सिध्दार्थ खरात,आ. अस्लम शेख या १४ सदस्यांचा समावेश आहे......
0 टिप्पण्या