🌟इयत्ता पहिली पासुन साखरा जिल्हा परिषद शाळेतच तिचे शिक्षण झाले🌟
✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. राजनंदिनी महेश चाकोते हीची नवोदय साठी निवड झाली आहे.इयत्ता पहिली पासुन साखरा जिल्हा परिषद शाळेतच तिचे शिक्षण झाले.
पहिलीपासूनच अत्यंत हुशार आणि अभ्यासु असणारी राजनंदिनीची नवोदय साठी निवड झाल्यामुळे साखरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी तसेच साखरा आणि येथील नागरिकांनी त्या विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आहे तसेच शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा साखरा यांच्या तर्फ अभिनंदन करण्यात आले.
0 टिप्पण्या