🌟वाशिम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार🌟
पुर्णा (दि.११ मार्च २०२५) - गंगाखेड तालुक्यातील पडेगाव या ठिकाणी रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी इयत्ता ०७ वर्गाच्या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षेत पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंठेश्वर शाळेच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक विष्णू रामराव बोबडे तृतीय क्रमांक श्रद्धा नरसिंग परडे व सहावा क्रमांक चंद्रकांत संतोष कदम या विद्यार्थ्यांनी पटकावला त्याबद्दल पडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना यथोचित बक्षीस देण्यात आले प्रमाणपत्र सन्मानचिन्ह भेटवस्तू व रोख रक्कम विद्यार्थ्यांना व शाळेला देण्यात आली वाशिम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते सदरील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक कारभारी नीरस सर यांनीही शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदन केले त्यानिमित्त शाळेत आज सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच हरिभाऊ कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विठ्ठलराव कदम उपाध्यक्ष सुनील कदम पोलीस पाटील गजानन कदम तसेच प्रतिष्ठित नागरिक बालाजी कदम विद्यार्थ्यांचे पालक रामराव बोबडे नरसिंग परडे व संतोष कदम हे सपत्नीक उपस्थित होते या कार्यक्रमात यशवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सर्व मान्यवरा तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री देशटवार सर यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिले व तसेच मुंढे सरांनी या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर सविस्तरपणे मांडला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले......
0 टिप्पण्या