🌟पुर्णा तालुक्यातील गौर गावात कुलरने घेतला दोन सख्ख्या जावांचा बळी : गावात पसरली शोककळा....!


🌟रमजान ईद निमित्त घराची साफसफाई करीत असतांना कुलर चालू करतेवेळी करंट लागल्याने लहान जावासह मोठ्या जावेचाही मृत्यू🌟


पुर्णा (दि.२६ मार्च २०२५) :
- पुर्णा तालुक्यातील गौर गावातील नवी आबादी परिसरात आज बुधवार दि.२६ मार्च रोजी दुपारी १२.०० ते १२.३० वाजेच्या सुमारास रमजान ईद निमित्त घरातील साफसफाई करीत असतांना गर्मी सुरू असल्याने कुलर लावत असतांना कुलरमध्ये शॉक उतरल्याने कुलरला चिपकून लहान जावेचा भयंकर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी आपल्या लहान जावाला काय झाले म्हणून तिला पाहण्यासाठी गेलेल्या मोठ्या जावेने तिला स्पर्श करताच तिचा देखील जबर शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेतील दोघी जावांनी रमजान महिन्यातील रोजा धरलेला होता.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की गौर गावातील जिल्हा परिषद शाळेलगतच्या नवी आबादी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या शेख जहुराबी शेख ईसूब वय ५२ वर्षं या आज बुधवार दि.२६ मार्च रोजी दुपारी १२.०० ते १२.३० वाचेच्या सुमारास पवित्र रमजान महिना सुरू असल्याने व रमजान ईद दि.३१ मार्च २०२५ रोजी असल्यामुळे घरातील साफसफाई करीत असतांना कुलर लावण्यास गेले असता त्यांना कुलरमध्ये जबर करंट उतरल्याने त्यांचा कुलरचा जबर शॉक बसल्याने जागीच मृत्यू झाला यावेळी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मोठ्या जावू बिस्मिल्लाबी इस्माईल शेख वय ५८ वर्षं यांनी त्यांना काय झाले म्हणून पाहण्यास जाऊन स्पर्श केला असता त्यांना सुद्धा जबर शॉक लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सांगितली यावेळी घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली यावेळी घटनास्थळी चुडावा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर तात्काळ दाखल झाले यावेळी त्यांनी घटनास्थळ पंचणामा करुन दोन्ही जावांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पुर्णा येथे रवाना केल्याचे समजते दरम्यान डिपीची अर्थिंग तुटल्यामुळे कुलरमध्ये जोरदार करंट उतरून जबर शॉक लागला असल्याचे ग्रामस्थांतून बोलल्या जात आहे सदरील घटना कशी घडली या संदर्भात पुढील तपास चुडावा पोलिस करत आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या