🌟एसीबीच्या पथकाने दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा क्रिडा अधिकारी व क्रिडा अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते🌟
परभणी : परभणी जिल्ह्याच्या लाचखोर जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांनी कामांच्या थकीत बिलांच्या मंजूरी साठी तक्रारकर्त्याला सुमारे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती त्यातील एक लाख रुपये पुर्वीच घेऊन उर्वरीत ०१ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारतांना वादग्रस्त जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर व क्रिडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले या प्रकरणी आज शुक्रवार दि.२८ मार्च रोजी संबंधित दोन्ही लाचखोरांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
क्रिडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह या स्विमिंग पुलावर २०२४ साली आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धांच्या एकूण ९५ लाख रुपयांचे थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर्त्याने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु केला परंतु प्रत्येकवेळी जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणिवपूर्वक त्रुटी काढल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकीत बिलांच्या मंजूरीकरीता क्रिडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे या दोघांच्या ०३ मार्च रोजी स्वतः भेटी घेतल्या. त्यावेळी नावंदे यांनी २ लाख रुपये व बस्सी यांनी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारकर्त्याने १३ मार्च रोजी नावंदे यांना क्रिडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष १ लाख रुपये सुपूर्त केले परंतु, उर्वरित दीड लाख रुपये द्यावयाची इच्छा नसल्याने या तक्रारकर्त्याने २४ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने २४ मार्च रोजीच लाच मागणीची पडताळणी केली. बस्सी व नावंदे यांची भेट झाली नाही. २५ मार्च रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी नावंदे यांची भेट झाली. तक्रारकर्त्याने प्रलंबित लाचेसंदर्भात बोलले असता नावंदे यांनी पक्षा समक्ष तक्रारकर्त्यास बस्सी सर येतील ते करुन टाका, असे म्हणून उर्वरित लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. या खात्याने त्या आधारे गुरुवार २७ मार्च रोजी सापळा रचला व नानकसिंह बस्सी यास ५० हजार रुपये व जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे यांना १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. आज शुक्रवार दि.२८ मार्च रोजी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.....
0 टिप्पण्या