🌟निर्भीड पत्रकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकुन सुपाऱ्या देऊन संपवलं जाते🌟
✍️परखड सत्य : रामेश्वर शिवाजी दरेकर
सध्या पत्रकार म्हटलं की पैसे घेऊन बातमी छापणारा जाहिरात दिली की उदो उदो करणार,लायकी नसलेल्या अधिकारी,कर्मचारी, राजकीय नेत्याच्या दावणीला बांधून त्यांना मोठ करुन आपलं चांगभलं करणारा पत्रकार सगळीकडे आढळुन येत आहे. यात पत्रकारिता शिक्षण घेतलेला पत्रकार दिसेनासा झाला आहे. ज्याला धड बातमी लिहिता येत नाही असा पत्रकार कुणालाही बोलु लागला आहे. एक न धड भारा भर चिंध्या अशामुळे जनतेला विशेष करून शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. दादागिरी, भाईगिरी,नेतेगिरी बाबतीत पत्रकार उत्सुकता दाखवताना दिसत आहे तो भाईगिरी नेतेगिरी बाबतीत प्रखड मत मांडताना घामाघूम होऊन चाटुगिरी करण्यात धन्यता मानत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाचा चौथा स्तंभ हा देशाला सुरक्षित ठेवु शकतो पत्रकार हा विरोधी पक्षनेता आहे ही बाब पत्रकार पुर्णतः विसरून गेला आहे. त्याला पत्रकार याची व्याख्या कळलेली नाही तो फक्त एकच ध्यास आपला विकास यावर समाधान मानत आहे.
महत्त्वाची विषय अनेक असताना तो नको त्या बातम्या देऊन जनतेचा विश्वास दिवसेंदिवस गमावत आहे. यामुळे निर्भिड आणि अभ्यासू वृत्ती असलेल्या पत्रकार यांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. निर्भिड पत्रकार यांना जनसामान्यांच्या मनातली खदखद व्यक्त करताना अधिकारी यांना धारेवर धरलं असता हे चमचेगिरी करणारे पत्रकार भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बातम्या छापून सत्यता दाबून टाकण्याचा डाव यशस्वी करित असतात. मात्र शेवटी सुर्य हा सुर्य असतो कितीही ढग दाटून आले तरी सुर्य प्रकाश देण बंद करित नाही मात्र ढगासारखी पत्रकारीता करणारे पत्रकार यांच्या मुळे काही काळ सुर्या सारखी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना त्रास होतो मात्र शेवटी सुर्यासारखे पत्रकार अनेक गोरगरिबांना, मागासलेल्या कुटुंबाला , शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी होतात.
विकाऊ पत्रकार स्वतः मोठा होत नाही दुसर्यांना कधी मोठा करणार नाही त्याचे विश्व फक्त बेडूक सारखं असतं. निर्भिड पत्रकार स्वतः मोठा असतो इतरांना न्याय देऊन त्यांच्या ह्रदयात मोठा झालेला असतो. निर्भिड पत्रकार यांना चटणीभाखर खाऊन त्याला मोठ्या होटेल मध्ये मध्ये जेवल्यागत वाटतं. विकाऊ पत्रकार मुळे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणं कठीण झाले आहे. विकाऊ पत्रकार दोन नंबरवाले यांच्या दावणीला बांधून त्यांच्या इशारावर पत्रकार नाचुन लायकी नसलेल्या रेती माफिया, मुरुम, स्टोन क्रेशर खदान धारक, मटका जुगार, करोडो रुपयांचा अपहार करणारे अधिकारी यांच्या दावणीला बांधून टाकला गेला आहे.
जनतेला न्याय देणारा निर्भिड पत्रकार बाबतीत दोन नंबर कामे करणाऱ्या गुन्हेगारांना तसेच अधिकारी यांना चुकीचे काही सांगून माथे भडकुन निर्भिड पत्रकार यांना जिवघेणा हल्ला करायला लावणे, त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करायला सांगणे, चांगले काम करणाऱ्या पत्रकारांना जागोजागी अडथळा निर्माण करणे त्यांची नामुष्की करणे यात समाधान मानत आहे. चांगले पत्रकार यांना अनेकदा अन्यायग्रस्त पिडित व्यक्ती यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतोनात इच्छा असताना न्याय मिळवून देता येत नाही तेव्हा निर्भिड पत्रकार खचुन जात असतो जेव्हा न्याय देणारे पत्रकार एखाद्या खोट्या गुन्ह्यात गोवलया जातो तेव्हा हे चाटुगिरी करणारे पत्रकार मोठ्या आनंदात भडक हेडलाईन्स छापून आनंद द्विगुणित करित असतात त्यांना माहिती नसते की सुर्यासारखे प्रकाश देणारे पत्रकार संपले तर देश हा महाराष्ट्र बिहार व्हायला वेळ लागणार नाही. याच उदाहरण बघितले आहे बिड जिल्हा बिड जिल्ह्यातील काही चाटु पत्रकार मुळे अनेक गुन्हेगार जन्माला आलेले आहे संतोष देशमुख प्रकरण असेल, सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरण असेल यास जबाबदार पोलिस विभाग तसेच या पोलिस विभागाला खत पाणी घालणारा नेता पोलिस व नेता गुन्हेगार कार्यकर्ते यांच्या तेल चोपडे पणाच्या बातम्या प्रसिद्ध करणारे पत्रकार बिडला बिहार करण्यास कारणीभूत आहे. जालना जिल्ह्यातील अन्वा गावातील कैलास बोराडे यांच्या विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या हल्ला खोरा बाबतीत कुणी बोलायला तयार नाही. जालना जिल्ह्यातील परतुर तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या खासगी वाहन चालक दत्ता सोपानराव डुबे यांची हत्या करण्यात आली असा आरोप कुटुंबातील आई, भाऊ नातेवाईक यांनी केला आहे याबाबत कुठलाही पत्रकार सत्यता लिहायला तयार नाही. दुसरीकडे तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या वर मुरुम माफिया यांनी केलेला हल्ला याबाबत सगळीच वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर बातमी छापायला पुढे आले मात्र घर नसलेल्या वाहन चालक बाबतीत कुठलेही वर्तमान लिहायला बोलायला तयार नाही कारण वाहन चालक दत्ता सोपानराव डुबे यांची आई भाऊ यांच्या कडे न्याय मिळवून घेण्यासाठी पैसा नाही यामुळे बातमी येणार नाही छोटी मुलं पत्नी डोक्यावर पतिच छत्र हरवलं म्हणून वेड्यासारखी न्याय मिळावा यासाठी भटकंती करित आहे गुन्हा पण आजपर्यंत दाखल झाला नाही असे अनेक प्रश्न अन्याय कारक महाराष्ट्र भर घडतात नको त्या असणार्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात अन्याय झालेल्या बातम्या वर्षानुवर्षे फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत पाऊस पत्रकार कधी पाडेल या प्रतिक्षेत असतात. असंच जर होत राहिले पत्रकार पत्रकाराचे पाय ओढत राहिला गुलामगिरी करित राहिला तर महाराष्ट्रात अराजकता माजेल भर दिवसा आया बहिणी यांची अब्रु वेशीवर टांगून लक्तरे तोडली जातील पत्रकार हळूहळू नामशेष होतील पत्रकार हा विकाऊ हा शिक्का मोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही. जर हा देश टिकून ठेवायचा असेल तर पत्रकार यांनी स्वाभिमानी असणं आवश्यक आहे स्वाभिमानी पत्रकार यांना मोठ करण्याची क्षमता महाराष्ट्रातील बंधु भगिनीं मध्ये आहे. न्याय देणारे पत्रकार यांना न्याय उशिरा आवश्यक मिळतो तो चिरस्थायी स्वरुपाचा असतो. सावली सारखी साथ कधीही न सोडणारा असतो. दैनिक बुलंद शक्ती वर्तमानपत्राच्या माध्यमातून सडेतोड भुमिका घेत राहिलो न्याय देत राहिलो अनेक वेळा हल्ला झाला वडिलांना मला पोलिस निरीक्षक पोलिस अधीक्षक यांनी हल्ला केला म्हणून गमवावे लागले भावाला रक्ताच्या थारोळ्यात माझ्या पत्रकारीते मुळे ओलेचिंब व्हावे लागले. आई आजपण पत्नी आज मुलगा पती घरी येतो की नाही जिव मुठीत घेऊन सारखं वाट पाहत असतात तरी पण मी महाराष्ट्र हे माझं कुटुंब देश सेवा हिच ईश्वर सेवा डोळ्या समोर ठेवून भुमिका मांडत असतो एकवेळ खाण्यासाठी भटकंती करणारा मी मला जनतेने न्याय दिला आहे.निर्भिड पत्रकार म्हणून भुमिका घेत असताना खंडणी सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र न्यायालयाने कुठल्याही प्रकारची पुरावे नसल्याने गुन्ह्यातुन निर्दोष मुक्त केले. आजही अनेक अधिकारी आमच्या सारख्या असंख्य निर्भिड पत्रकार यांना जिवघेणा हल्ला करून खोट्या गुन्ह्यात अडकवतात यामुळे जनतेला आव्हान की अशा पत्रकारां साथ दिली पाहिजे. मंठा तालुक्यातील तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या बाबतीत दैनिक बुलंद शक्ती कडून सगळा भ्रष्टाचार पुढे आणला जात आहे. तहसीलदार सोनाली जोंधळे देखील वाळू माफिया यांना हाताशी धरून प्राणघातक हल्ला करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव आखत आहे.मात्र आम्ही सत्य परिस्थिती आधारित बातम्या प्रसिद्ध करुन सत्यता समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही.
✍️परखड सत्य : रामेश्वर शिवाजी दरेकर
संपादक - दैनिक बुलंद शक्ती 9767535819
0 टिप्पण्या