🌟भोकरदन तालुक्यातील मौजे अन्वा गावातील मंदिरात दर्शनाला गेलेल्या युवकाला समाजकंटकांकडून गंभीर मारहाण...!


🌟पुर्णेतील सकल धनगर समाज बांधवांकडून समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी🌟

पुर्णा (दि.०५ मार्च २०२५) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या मौजे अन्वा या गावात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरात देव दर्शनासाठी गेलेला धनगर समाजातील युवक कैलास गोविंदा बोराडे यांना आमच्या मंदिरात का आला असे म्हणून याच गावातील काही जातीवादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी लोखंडी रॉडने गंभीर स्वरूपाची मारहान करुन अत्यंत निर्दयीपणे त्याच्या शरीरावर लोखंडी रॉड गरम करुन अक्षरशः चटके दिले या घटनेच्या निषेधार्थ आज पुर्णा येथील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने पुर्णा तहसिलचे तहसिलदार बोथीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून त्या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

पुर्णेतील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने भोकरदन तालुक्यातील मौजे अन्वा गावातील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आज बुधवार दि.०५ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील मौजे अन्वा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास गोविंदा बोराडे हा युवक देवाच दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिरात गेला असता गावातील काही जातीयवादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी तु आमच्या मंदिरात का आला म्हणून लोखंडी रॉड ने अमानुषपणे गंभीर स्वरूपाची जबर मारहान केली एवढ्यावरच न थांबता समाजकंटकांनी राक्षसी वृत्तीचा प्रत्यय देत लोखंडी रॉड गरम करुन त्याच्या शरीरावर चटके देवुन मारहान केली अशा गुंड प्रवृतीच्या लोकांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा सर्व धनगर समाज बाधवांच्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर विश्वनाथ होळकर,जगन्नाथ रेनगडे,संतोष पारटकर, लक्ष्मण वैद्य,मुंजाजी बनसोडे,कोंडीबा दळवे,प्रकाश भंडे,पांडुरंग सकनुर, हरिश्चंद्र बारसे,वैभव वैद्य,मुंजाजी साखरे,चांदू पाळते,कैलास बारसे,एकनाथ गिराम,संजय डुबेवार,आनंता बनसोडे,देवकते राजेश,लांडे सखारामजी सिताराम,रोडे,नवघरे आर.व्ही,क्षिरसागर साहेब,अन्नववार सर,पिसाळ आर.एम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत...........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या