🌟पोलिस प्रशासनाला सतर्कतेसह हुल्लडबाज तळीरामांविरोधात कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता🌟
परभणी जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून सातत्याने चर्चेत राहणारा तालुका म्हणून पुर्णा तालुक्याला लागलेला कलंक बऱ्याच प्रमाणात पुसण्याच्या दृष्टीने प्रशासन जसे प्रयत्नशील आहे त्याच प्रमाणे पुर्णा तालुक्यातील काही तत्वनिष्ठ सामाजसेवक तसेच शांतताप्रिय प्रतिष्ठीत नागरिक काही आजी/माजी लोकप्रतिनिधी देखील सातत्याने सामंजस्याची भुमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य करीत असल्याने मागील काही वर्षांपासून पुर्णा शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पुर्णा शहरातील काही तत्वनिष्ठ सामाजसेवक व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची भुमिका प्रत्येकवेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचीच राहिल्याने मागील वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील संविधान प्रतिकृती विटंबनेच्या दुर्दैवी घटनेनंतर देखील पुर्णा शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिली याचे सर्वस्वी श्रेय येथील तत्वनिष्ठ सामाजसेवक तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश दादा कांबळे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते उत्तमभैया खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित,ॲड.हर्षवरधन गायकवाड यांनाच जाते जगाच्या पाठीवर कुठलीही अघटीत घटना घडली की त्याचे तीव्र पडसाद पुर्णेत उमटतात परंतु प्रत्येकवेळी शांतताप्रिय सर्वधर्मीय प्रतिष्ठीत नागरिक समाजसेवक काही आजी/माजी लोकप्रतिनिधी सामंजस्याची भुमिका घेऊन शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतात ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल.
पुर्णा शहरासह तालुक्याला लागलेला अतिसंवेदनशीलतेचा कलंक हा काही अतिउत्साही हुल्लडबाज मद्यपी तळीरामांमुळेच लागल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाल्यानंतर देखील अशा हुल्लडबाज तळीरामांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याचे पाहावयास मिळते आज गुरुवार दि.१३ मार्च रोजी होळी तर उद्या शुक्रवार दि.१४ मार्च २०२५ रोजी धुलीवंदन असल्याने हा सन राष्ट्रीय/सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने फार महत्वाचा मानला जातो या दिवशी प्रत्येक जण आपापल्या मनातील राग द्वेष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात व एकमेकांना होळी/धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत असतात परंतु काही विघ्नसंतोषी मद्यपी तळीराम असेही असतात जे होळी/धुलीवंदनाचा फायदा घेऊन अत्यंत द्वेष भावनेने गलिच्छ शिवराळ भाषेचा वापर करुन धुलीवंदनाच्या रंगांना बेरंग करीत सामाजिक स्वास्थ्य बिघवण्याचा गंभीर प्रकार करीत असतात अशा समाज घातक्यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागणार आहे.
सद्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे अशा वेळी यथेच्छ मद्य ढोसून इच्छेविरुद्ध रंग लावण्याची जबरदस्ती गलिच्छ शिवराळ भाषेचा वापर जातीय/धार्मिक भावना दुखावणे अशा पध्दतीच्या घोषणा देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मद्य ढोसून सुसाट वाहनं पळवणाऱ्यांवर कलम १८५ अंतर्गत ड्रिंक अँड ड्राइव्ह कायद्यांतर्गत कठोरात कठोर कारवाया कराव्या लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जवाबदारी जशी पोलिस प्रशासनाची आहे तिचकीच जवाबदारी एक जवाबदार नागरिक म्हणून पुर्णेतील सर्वधर्मीय सर्व समाजातील प्रत्येक नागरिकाची देखील आहे त्यामुळे सर्वांनीच एकमेकांच्या भावनांचा आदर करुन प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे......
0 टिप्पण्या