🌟रशिया-युक्रेन या दोन देशांतील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी रणनीती आखणार....!

 


🌟युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला पुढाकार🌟

लंडन : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. आता हे युद्ध थांबवण्यासाठी युरोपही सरसावला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रणनीती आखण्यास इंग्लंड, फ्रान्स व युक्रेनने मान्यता दिली आहे अमेरिकेचा दौरा आटोपून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यांनी इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स व युक्रेनने रणनीती आखण्याचे ठरवले आहे. ही रणनीती अमेरिकेसमोर सादर केली जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी लंडनमध्ये युक्रेनप्रकरणी तातडीने चर्चा करण्यासाठी युरोपातील नेत्यांची बैठक बोलावली होती. तत्पूर्वी, स्टार्मर व झेलेन्स्की यांची बैठक झाली. तुम्हाला संपूर्ण इंग्लंडचा पाठिंबा आहे, असे आश्वासन इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी यावेळी झेलेन्स्की यांना दिले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या