🌟देश विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल🌟

 ✍️ मोहन चौकेकर

 * महाराष्ट्र राज्य :-

◆ _महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ASI अंतर्गत शिवरायांचे किल्ले राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी_

◆ _अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली कार अपघातात भीषण जखमी; मुंबई-नागपूर महामार्गावर दुर्घटना_

◆ _आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ; दिशा सालियान हिच्या वडिलांकडून नव्याने चौकशीची मागणी_

◆ _प्रशांत कोरटकर मागच्या दाराने कोर्टात हजर, कोल्हापूरकरांनी दाखवलं पायतान_

◆ _कुणाल कामरा विरुद्ध एफआयआर, मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी; गाण्यातील 'गद्दार' शब्दावरुन वाद_

◆ _दौंडमध्ये कचराकुंडीत आढळले प्लास्टिकच्या डब्यात भरून फेकून दिलेले 10 ते 12 मृत अर्भके; बेकायदेशीर गर्भपाताची शक्यता, तपास सुरु_

◆ _नालासोपारा येथे 24 वर्षीय मुलीने सावत्र वडिलांच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला; सततच्या लैंगिक शोषणामुळे होती त्रस्त_

◆ _महाराष्ट्र बारावी बोर्ड 2025 च्या निकालाची संभाव्य तारीख, रिझल्ट पहाण्यासाठी mahresult.nic.in संकेतस्थळाला भेट द्या_

🇮🇳 देश :-

◆ _Saugat-e-Modi Kits: भाजपची गरीब मुस्लिमांना मोठी भेट; Eid al-Fitr निमित्त देशातील 32 लाख लोकांना वाटण्यात येणार सौगात-ए-मोदी किट्स_

◆ _Chhaava in Parliament: संसदेत होणार 'छावा' चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग; PM नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदार राहणार उपस्थित_

◆ _भविष्य निर्वाह निधी UPI आणि ATM द्वारे काढता येणार; EPFO जून 2025 पासून सुरु करणार प्रक्रिया_

◆ _

◆ _8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लवकरच स्थापन होण्याची शक्यता, पुढील महिन्यात मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित_

◆ _MPs Salary Hike: केंद्र सरकारची खासदारांना मोठी भेट! पगारासह भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ_

◆ _National Task Force: विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचा दिला आदेश_

◆ _उत्तर प्रदेशमध्येही एकावर एक दारु बॉटल देण्यास सुरुवात; 31 मार्चपर्यंत साठा संपविण्याची नामुष्की_

◆ _पुढील 15-20 वर्षे तुमचा नंबर येणार नाही..; राज्यसभेतून अमित शाहांची विरोधकांवर बोचरी टीका_

◆ _लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर, हा कर झाला रद्द; इतर ३४ बदलांचाही समावेश_

◆ _छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; 25 लाखांच्या इनामी नक्षलवाद्यासह 3 ठार..._

◆ _विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय_

◆ _Ranya Rao : सोने तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर; हवाला पैशांचा वापर करून सोने खरेदी केल्याची रान्या रावची कबुली_

◆ _दिल्ली सरकारचा एक लाख कोटींचा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री गुप्ता यांनी ‘महिला समृद्धी योजने’साठी तिजोरी उघडली_

✈️ आंतरराष्ट्रीय :-

◆ _अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी; आपणच आणलेला टॅक्स हटविला_

◆ _US Restrictions: अमेरिकेनं इशारा दिला व्हेनेझुएलाला, परिणाम होणार भारतावर; २५ टक्के कर लागू होणार!_

◆ _Donald Trump: ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याची करामत; येमेन युद्धाच्या गोपनीय चॅट ग्रुपवर भलत्याच व्यक्तीला केलं अ‍ॅड, उपाध्यक्षांचे चॅट्स झाले लीक!_


⚽ खेळ जगत :-

◆ _मुंबई इंडियन्सच्या खाणीतील नवा हिरा; फिरकीपटू विघ्नेशची लक्षवेधी कामगिरी_

◆ _IPL 2025, DC vs LSG : २७ कोटींची बोली लागलेला ऋषभ पंत पहिल्याच सामन्यात फेल; सोशल मीडियावर Memes व्हायरल

▪️ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना अडकवण्यासाठी शरद पवारांच्या नेत्यांचा हात, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दावा

▪️ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, बिनविरोध निवड; अध्यक्षांकडून उद्या सभागृहात घोषणा होणार

▪️ जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली

▪️ मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं, अनिल परब यांचा सभागृहात अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरे गालातल्या गालात हसले

▪️ शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 मार्चपर्यंत सरकारी 'पाहुणचार' 

▪️ कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, बीड जिल्ह्यातील डॉ. अशोक थोरात निलंबित; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

▪️ भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिन असलेले राज्यातील सर्व किल्ले हे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्र सरकारकडे मागणी

▪️ अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूर -वर्धा रोडवर अपघात; कारची ट्रकला धडक; सोनाली सूद सुखरुप; कोणीही गंभीर जखमी नाही 

▪️ रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा विरोध

▪️ पोलिसांकडून बीडमधील खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम                             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या