🌟पूज्य भदंत डॉ उपगुप्त महास्थवीर यांच्या भिक्खू जीवनाला आज दि.०५ मार्च रोजी ५० वर्षे झाली पूर्ण🌟
अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ उपगुप्त महास्थवीर यांच्या भिक्खू जीवनाला दिनांक ०५ मार्च २०२५ या दिवशी ५० वर्षे पूर्ण होत आहे चरख चारीख भिकवे बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांन्यू कंपाय या पवित्र बुद्ध वचनानुसार बुद्ध धम्म विचार प्रणाली जनमानसामध्ये रुजवण्याचं काम सातत्यपूर्ण ते करत आहे स्वतःला त्यांनी फक्त एका बुद्ध विहारांमध्ये बंदिस्त करून घेतले नाही मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून धम्म संस्कार केंद्रे उभी आहे.
बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा धम्मांचल अजिंठा लेणी आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलू सात करणी महाविहार लातूर भदंत आनंद कौशल्यायान महाविहार बीड,बावरी नगर महाविहार नांदेड खुरगाव नांदेड श्रामणेर प्रशिक्षण केंद्र मुदखेड येथील महाविहार हिंगोली येथील महाविहार अशा प्रकारची अनेक बुद्ध धम्म संस्कार केंद्रे त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून उभी आहेत त्यांच्या संस्कारातून शिकवणीतून वीस भंतेजी प्रशिक्षित झाले आहेत. त्यांचे पूज्य गुरु स्मृतीशेष भंतेजी उपाली थेरो यांच्या संस्कारातून त्यांची जडणघडण झाली उपाली थेरो सैन्यामध्ये सैनिक होते त्यांच्या अंगी कठोर शिस्त होती.
अंधश्रद्धा रूढी परंपरा बुवाबाजी या मधून समाज मुक्त व्हावा यासाठी ते प्रबोधन करत प्रबोधन दृष्टीचे आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असे. महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आपल्या गुरुचा महान आदर्श डोळ्यासमोर ठेवून भदंत डॉ उपगुप्त महाथेरो अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून भिकू जीवनाला सुरुवात केली ते दहावीला चार वेळा नापास झाले होते आपले पूज्य गुरु उपाली थेरो यांनी त्यांना उपदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला शिक्षण घ्या अशा प्रकारचा महान उपदेश दिला आहे आणि त्यामुळे तू कितीही वेळा नापास झाला तरी परीक्षा देत जा अभ्यास करीत जा आपल्या गुरुचे म्हणणे काळजीपूर्वक लक्षात घेऊन त्यांनी परीक्षा दिल्या व ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले नंतरच्या काळामध्ये त्यांनी मागे वळून पाहिले नाही एम.ए पाली नेट सेट आणि पाली विषयांमध्ये त्यांनी पीएचडी मिळवली महाविद्यालयामध्ये मोठ्या पगाराची प्रोफेसर म्हणून त्यांना संधी आली होती.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांनी त्यांच्यासमोर तशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला होता परंतु त्यांनी तो नम्रपणे नाकारला. स्थितप्रज्ञ राहून बुद्ध धम्म व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी विचार देश विदेशामध्ये प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम केलं दक्षिण कोरिया जपान थायलंड श्रीलंका म्यानमार व इतर देशांमध्ये जाऊन आपल्या कर्तुत्वाचा धम्म ज्ञानाचा ठसा त्यांनी उमटविला दक्षिण कोरियामध्ये त्यांच्या प्रयत्नांमधून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी समारंभपूर्वक बसविण्यात आला कोरिया येथील पूज्य भिकू ना त्यांच्या मार्गदर्शनातून धनगर टाकळी येथील गोदापात्रातील बेटावर भिक्खू जीवनाची उपसंपदा दिली त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी धम्म परिषदेचे आयोजन यशस्वीपणे केला जातो.
यामधून शील सदाचार व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानव मुक्तीचे विचार पूज्य भंते आपल्या धम्मदेशेमधून सांगत असतात यामधून आदर्श बौद्ध उपासक उपासिका तयार होताना दिसत आहे गेल्या 40 वर्षापासून धम्म सहलीचा आयोजन केल्या जात बुद्ध धम्म दर्शन सहलीतून हजारो उपासक उपासिका आतापर्यंत जाऊन आले आहेत बुद्ध विहारांमध्ये सुसज्ज वाचनालय ग्रंथालय अभ्यासिका ज्यामध्ये सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थी विद्यार्थिनीला मोफत प्रवेश आहे पूर्णा येथील बुद्ध विहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी झाले आहेत आज बुधवार दि.०५ मार्च २०२५ या पवित्र मंगल दिनी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो त्यांच्या भिक्खू जिवणाला पन्नास वर्षे पुर्ण होत आहे या मंगल प्रसंगी त्यांना आयू आरोग्य बल प्राप्त होवो ही मनोकामना....!
शुभेच्छुक
श्रीकांत हिवाळे सर
मा. तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.
0 टिप्पण्या