🌟साधारणतः एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट🌟
मुंबई :- भारतीय हवामान विभागानं महत्वाची माहिती दिली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (३१ मार्च २०२५) ही माहिती दिली आहे.
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारणतः एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते......
0 टिप्पण्या