🌟अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन रौंदळे...!


🌟नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एस.पी.सिंह बघेल यांच्या हस्ते रामकिशन रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले🌟

परभणी (दि.२६ मार्च २०२५) : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन दत्तराव रौंंदळे यांची अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

           नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एस.पी.सिंह बघेल यांच्या हस्ते रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंह होळकर, कोषाध्यक्ष नवलसिंह धनगर, रामप्रकाश होळकर, सिताराम बघेल, मुरारी लाल, गौरव बघेल यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

           धनगर समाजाच्या हितासाठी केलेले कार्य आणि धनगर जातीला संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन व समर्पण लक्षात घेऊन अखिल भारतीय धनगर समाज महासंघ, दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने रौंदळे यांची दोन वर्षांसाठी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन केले आहे. रौंदळे हे अ.भा.धनगर समाज महासंघाशी एकनिष्ठ राहून महासंघाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष अजयपालसिंह होळकर यांनी नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या