🌟हरी ओम रुग्णवाहिकेचे संतोष जाधवांचा ग्रामीण रुग्णालया समोर पाणपोईचा कौतुकास्पद उपक्रम🌟
जिंतूर (दि.१३ मार्च २०२५) - जिंतूर येथील हरी ओम रुग्णवाहिकेचे मालक संतोष जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शुद्ध जल फिल्टर पाणपोईचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णांचे नातेवाईक तसेच तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनसाठी शीतल व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध केली.
राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते फिल्टर युक्त शीतल पाणपोईचे उद्घाटन प्रसंगी संतोष जाधव यांनी स्वखर्चातून शुद्ध पाणी देऊन एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याचे आम्ही स्वागत केले. अशा माध्यमातून नागरिकांना शुद्ध व शीतल पाणपोई जागोजागी लावल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल तसेच त्याचे आरोग्य पण चांगले राहील असे म्हणत त्याचे कौतुक केले.
मूळ अंबरवाडीचे संतोष जाधव रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मागील 18 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे. दरम्यान सेवेच्या माध्यमातून आलेल्या अनेक अडचणी पैकी प्रमुख अडचण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक साठी पिण्याच्या पाण्याची अपसोय प्रकर्षाने जाणवत होती . हीच अडचण लक्षात घेऊन संतोष भाऊंनी मागील पाच वर्षापासून पाणपोई चालवत आहे. सदरील पानपोई मातीच्या रांजना मधून वितरित करत होतो, परंतु रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागेतील रांजण वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून नुकसान होत होती. म्हणून आधुनिक पानपोई चा संकल्प करून १ लाख १० हजार रुपये खर्च करून मोफत पाणी वाटप सेवा देण्याचा संकल्प पूर्ण केला. खर्चामध्ये बंदिस्त शेड ३० हजार रुपये, वॉटर कुलर ४०,००० रुपये विद्युत कनेक्शन, ५०० लिटरची पाण्याची टाकी स्टॅन्ड फिटिंग चे साहित्य व इतर खर्च १ लाख १० हजार रुपये खर्च स्वखर्चातून करून नागरिकांना शुद्ध जल फिल्टर युक्त शीतल पाणपोई सुरू करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी डॉ. दहिफळे,डॉ.पंडित दराडे,शैलेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, पत्रकार सचिन रायपत्रीवार, विकास जाधव व मित्र परिवार उपस्थित होते......
0 टिप्पण्या