🌟मराठा सेवा संघाने केले आवाहन🌟
परभणी (दि.२६ मार्च २०२५) :- मराठा सेवा संघ व 32 कक्ष आयोजित जिजाऊ रथयात्रा-2025 शुक्रवार 28 ते 29 मार्च दरम्यान परभणी जिल्ह्यात दाखल होत आहे. सर्व अठरा पगड जातीच्या समाज बांधवांनी या रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. जिजाऊ रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंती दिनी 18 मार्च रोजी भोसले गढी, वेरूळ जि. छत्रपती सभाजीनगर येथून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिन 1 मे रोजी पूणे येथे लाल महाल येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. परभणी जिल्ह्यात रथयात्रा 28 ते 29 मार्च दोन दिवस राहणार आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे दुपारी 4 वाजता आगमन होत आहे. पालम मार्गे गंगाखेड आणि मुक्काम राहणार आहे. शनिवार 29 मार्च रोजी परभणी मराठा सेवा संघाने सर्व अठरा पगड जातीच्या समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे सकाळी 9 वा आगमन होणार आहे. परभणी येथे 10 वा, मानवत येथे दुपारी 2 वा आणि पाथरीत सायंकाळी 6 वाजता पोहचणार आहे. जिजाऊ रथयात्रेचा उद्देश समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक आणि राजकीय उन्माद यासारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रौढ महिला-पुरुष यांच्याशी संवाद व समाजाला एकसंघ करण्याबाबत मार्गदर्शन होणार आहे. समाज बांधवानी या रथयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या