🌟अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूर -वर्धा रोडवर अपघात; कारची ट्रकला धडक; सोनाली सूद सुखरुप🌟
1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, बिनविरोध निवड; अध्यक्षांकडून उद्या सभागृहात घोषणा होणार
2. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना अडकवण्यासाठी शरद पवारांच्या नेत्यांचा हात, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात दावा ; जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी, तिला काय वाटत असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत सवाल ; जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
3. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 मार्चपर्यंत सरकारी 'पाहुणचार' ; चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
4. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर खळबळजनक आरोप ; मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं, अनिल परब यांचा सभागृहात अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरे गालातल्या गालात हसले!
5. आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला ठरल्या अपात्र, तर 61 महिलांनी स्वत: हून लाभ सोडला ; पुण्यातील 16 हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात; योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणीत माहिती समोर
6. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, बीड जिल्ह्यातील डॉ. अशोक थोरात निलंबित; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा ; मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदार संजय उपाध्ये विधानसभेत दावा
7. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा विरोध ; भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिन असलेले राज्यातील सर्व किल्ले हे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्र सरकारकडे मागणी
8. पोलिसांकडून बीडमधील खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम ; वाल्मिक कराड पाठोपाठ सतीश भोसलेला व्हिआयपी ट्रिटमेंट, पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन
9. अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूर -वर्धा रोडवर अपघात; कारची ट्रकला धडक; सोनाली सूद सुखरुप; कोणीही गंभीर जखमी नाही ; स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा; बुलढाणा जिल्ह्यातील घटना
10. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये चिमुकल्या बाळांचे अवयव, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 7 अर्भकं फेकून दिली, पुणे जिल्ह्यातील दौंडमधील धक्कादायक दृश्य ; शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बसचालकाकडून अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना ; शाळेत जाताना खाऊ देण्यासाठी बोलावलं अन्...; चौथीत शिकणार्या मुलीवर 27 वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार, पुण्यातील घटनेनं संताप
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या