🌟रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेवरही दबाव : अमेरीकेला मागण्यांची दिली मोठी यादी....!


🌟त्यासाठी शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीसाठी मागण्यांची मोठी यादी तयार केली आहे🌟

मॉस्को :- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून युक्रेनवर दबाव आणला आहे. त्यामुळे युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दबावाखाली येऊन ३० दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे. आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यासाठी शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीसाठी मागण्यांची मोठी यादी तयार केली आहे.


या मागण्या अमेरिकेने स्वीकाराव्यात व युक्रेनवर दबाव आणावा.तरच आपण शस्त्रसंधी स्वीकारू,असे पुतिन यांनी सांगितले.व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेवरही दबाव पुतीन यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत, ते नेमके कळू शकले नाही. मात्र नाटोचे सदस्यत्व युक्रेनला मिळू नये, अशी मोठी मागणी पुतिन यांनी ठेवली आहे पुतीनच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिका व नाटो यांनी आश्वासन द्यावे की युक्रेनला त्यांचे सदस्यत्व दिले जाणार नाही. तसेच रशियाच्या शेजारीला देशांना 'नाटो'त सामील करून घेऊ नये. नाटोचा विस्तार पूर्व युरोपमध्ये होऊ नये, याची हमी रशियाला हवी आहे.

युक्रेनवरील रशियन हल्ल्याचे मोठे कारण हेच होते. रशिया सातत्याने सांगत होता की, नाटो देशांच्या वतीने युक्रेनमध्ये सैन्य तैनात केले जाऊ शकत होते. त्यामुळे रशियाच्या सीमांना धोका निर्माण झाला असता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनवर फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने हल्ला केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या