🌟राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ब्लॅकमेलींग प्रकरणात खा.सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांचा हात ?


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत गंभीर आरोप🌟

मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेकडून झालेल्या गंभीर आरोपानंतर एक कोटी खंडणी प्रकरणी तीला अटक करण्यात आली या प्रकरणात महिलेच्या मोबाईलचा तपास केला असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांचा या प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवार दि.२५ मार्च रोजी राज्याच्या विधानसभेत केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नग्न फोटो पाठवले जात असल्याचा आरोप एका महिलेने केला होता. २०१६ पासून २०१९ पर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. परंतु मंत्री जयकुमार गोरे यांनी माफीनामा दिल्यामुळे केस वापस घेतल्याचा दावा सदर महिलेने केला होता. आरोप करणाऱ्या महिलेला काही दिवसांपूर्वी एक कोटीची लाच घेताना सातारा पोलीसांनी अटक केली. सदर महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या मित्राकडे तीन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १ कोटी रुपये देतांना सदर महिलेला सातारा पोलीसांनी रंगेहाथ पकडले. याविषयी विधानसभेत निवेदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण योग्य करणे योग्य नाही. घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर मंत्री गोरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली त्यानंतर सापळा रचला. पैसे देताना आरोपीला पकडलं. या प्रकरणात चार तक्रारी झाल्या आहेत. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. एक ती महिला आहे. दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसून आलेत. मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आहेत. गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या