🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा....!


🌟पुर्णा तालुका सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे मागणी🌟 

पुर्णा : बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.या हत्या प्रकरणाचा कट रचना-या आरोपी वाल्मिक कराड व मारेकरी यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करणारे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे तसेच आरोपी वाल्मिक कराड यांच्या अवैध धंद्याची आणि मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करुन सदरील मालमत्ता सरकारखाती जप्त करण्याची मागणी पूर्णा तालूका सकल मराठा समाजाच्या वतीने ता ५ मार्च रोजी तहसीलदार यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे.

शिवाय, महाराष्ट्राचे आराध्यदैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमानास्पद बेताल वक्तव्य करणारे अबू आझमी, प्रशांत कोरटकर, राहूल सोलापूरकर यांनी मराठा समाज बांधव व शिवप्रमींच्या भावना दुखावल्या आहेत.या देशद्रोहीचा जाहीर निषेध करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची देखील यावेळी एक वेगळे निवेदन देवून मागणी करण्यात आली.या प्रसंगी, ज्ञानोबा कदम,प्रा पुंडलिक जोगदंड,शिवाजी बोबडे, रमाकांत पाटील क-हाळे,‌संजयराव कदम, लक्ष्मणराव शिंदे, विधीज्ञ यादवराव डाखोरे,गोविंद शिंदे, दिनेश क-हाळे, कैलाश पारवे यासह असंख्य सकल मराठा बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या