🌟हल्लेखोरांना दहा दिवसांत अटक न केल्यास भर चौकात आत्मदहन करण्याचा अरुण पवार यांनी दिला इशारा🌟
परभणी :- परभणी येथील निर्भिड व धाडसी समाजसेवक तथा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर अज्ञात तिन ते चार समाजकंटकांनी मागील दिड महिन्यांपूर्वी दि.३१ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास धार रोड वरून परभणी कडे येत असताना प्राणघात हल्ला केल्याची भयावह घटना घडली होती या घटनेला जवळपास दिड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील घटनेतील हल्लेखोर अटकेपार असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटने संदर्भात अरुण पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करीत असे म्हटले आहे की संबंधित हल्लेखोरांनी मला जिवे मारण्याच्याच हेतूनेच माझावर हल्ला केला होता त्यांच्या पासून पुढे ही माझ्या जिवीताला धोका आहे या हल्ल्यातील हल्लेखोर असेच मोकाट फिरत राहिले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल व ते परत माझ्या विरुद्ध कट रचून मला जिवे मारतील या साठी माझी पोलिस प्रशासनास विनंती आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी माझे काही बरे वाईट झाले तर प्रशासन जवाबदारी राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी घटनेतील आरोपींना जर १० दिवसात पोलिस प्रशासनाने अटक केली नाही तर मला नाईलाजास्तव दहा दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील ऑफिस मध्ये आत्मदहन करावे लागेल असे देखील अरुण पवार यांनी म्हटले आहे.......
0 टिप्पण्या