🌟शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी राहुल कनाल यांचा इशारा🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत विडंबनात्मक गाणे म्हणून टीका करून प्रचंड वादाला निमंत्रण देणाऱ्या स्टँडअप कॅमेडियन कुणाल कामराचे मुंबईत 'शिवसेना स्टाईल'ने स्वागत करण्यात येईल असा इशारा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी राहुल कनाल यांनी काल सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी दिला.
कामरावर एका प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये परफॉर्म करताना कामराने शिंदे यांना नाव न घेता त्यांच्यावर टीका करत एक विडंबन काव्य सादर केले होते त्यानंतर कामराच्या स्टँडअप परफॉर्मन्सचे स्टुडिओ उद्ध्वस्त केल्याप्रकरणी २३ मार्च रोजी कनाल आणि इतर ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती.
कनाल यांनी सांगितले की, परकीय निधी आणि बेहिशोबी पैशांबाबत तपास करण्यासाठी विनोदवीर कामरावर विदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत चौकशी करावी, यासाठी शिवसेनेने मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे.कायद्यापासून पळून जातात ते दोषी असतात. कुणाल कामराचे 'शिवसेना स्टाईल' ने स्वागत होईल, असे स्पष्ट करत कनाल यांनी म्हटले आहे की, आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. कारण कामराची भूमिकाही तशीच आहे. कनाल यांनी म्हटले आहे की, तमिळनाडू पोलीस कामराला संरक्षण देत आहेत.
मुंबई पोलिसांनी ३१ मार्च रोजी कामराला हजर राहण्यास सांगितले आहे. कारण त्याने शिंदे यांच्याविरोधात अपमानास्पद टीका केल्याचा आरोप आहे गेल्या आठवड्यात मद्रास उच्च न्यायालयाने कामराला तात्पुरती जामीनपूर्व संरक्षण मंजूर केले....
0 टिप्पण्या