🌟 नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोढांरकर यांच्या कार्य शैली मुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या....!


🌟आता पर्यंत असा एक ही आमदार जो टू व्हीलर वरून सकाळी सकाळी लोकांना भेटायला आलेला कधी ऐकले नव्हते🌟

सोशल मीडिया च्या माध्यमातून आमदार आनंदराव पाटील बोढांरकर  टू व्हीलर वरून सकाळी गोबिंदबागला मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना चर्चा करत असताना नजरेस पडले.... आता पर्यंत असा एक ही आमदार जो टू व्हीलर वरून सकाळी सकाळी लोकांना भेटायला आलेला कधी ऐकले नव्हते. आमदार साहेब टू व्हीलर वरून आल्याने त्यांना वाईट रस्त्याची अनुभुती निश्चितच झाली असावी..... यांच्या व्यतिरिक्त बोढांरकर साहेब आमदार बनल्या बनल्या विधान सभेत तसेच मंत्री महोदयांना भेटून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साठी प्रयत्न केलेले ही विसरता कामा नये. ह्याच्या सोबत सोबत महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांना नागरीकांना योग्य मुलभूत सुविधा देण्याच्या सूचना दिल्याचे ही निर्दशनास आलेले आहे.... ह्या मुळे नागरीकांच्या मनात हा आमदार जनतेच्या भल्यासाठी काही काम करेल ही भावना निश्चितच वाढलेली आहे.... परंतु जर फक्त सोशल मीडिया वर प्रसिध्दी साठी फक्त जनतेशी चर्चा करने व जनतेच्या समस्या बाबतीत प्रश्र्न उठवणे इथ पर्यंतच जर आमदार साहेब मर्यादित राहिले तर आमदार साहेबांनी नांदेडच्या दक्षिण मतदारसंघाचा इतिहास लक्षात ठेवणे ही जरूरीचे आहे कारण दक्षिण मतदारसंघात आज पर्यंत जनतेनी कोणत्याही नेत्याला दुसऱ्यांदा संधी दिली नसल्याचा इतिहास पाहिला मिळतो आनंदराव पाटील साहेब ही प्रथा मोडून काढतील की नाही हे भविष्यात कळेल..... आमदार साहेब आपल्या कार्य शैली मुळे एक विनंती करू इच्छित आहे की जसे आपण टू व्हीलर वरून सकाळी सकाळी गोबिंदबाग ला भेट दिली तशीच भेट गुरूद्वारा आजुबाजूच्या परिसरात,अबचलनगर मधील सर्व भागात रात्रीच्या वेळी भेट देवून नागरीकांच्या समस्या जाणून घ्याव्यात....या दरम्यान आपल्याला लाईट,रस्ते, साफसफाई बद्दल एखाद्या अविकसित खेड्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.... आणखी एक विशेष विनंती संत बाबा निधान सिंघ जी चौरस्ताच्या वर पादचारी पूलाची फारच दुरावस्था झालेली आहे  व खुप मोठ मोठाले छिद्र पडलेले आहेत..तसेच या पुलाला हटविण्याची मंजुरी मिळूनही दोन तीन वर्षे होत आहेत सातत्याने शिख समाजाच्या वतीने या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठपुरावा केल्यानंतर ही काही कार्यवाही होत नाही तरी होळीच्या सणाला येणारे यात्रेकरू या पुलावर चढून उभे राहतात कधी काही पुल तुटून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ह्या प्रश्नी आपण जातीने लक्ष घालून होळी सणाच्या अगोदर हा पुल हटविण्याची योग्य त्या सुचना द्यावेत ही विनंती...आपल्या बद्दल लोकांना पाहिजे तशी माहिती नाही परंतु जनतेने मा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व मा आ हेमंत भाऊ पाटील साहेब व नवीन माणसाला संधी दिल्यास काही तरी विकास कामे होतील हीच अपेक्षा ठेवून आपल्याला निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने जनतेने आपल्याला विजयी केले असे जाणवते....तसे पाहिले तर मा मोहनराव अन्ना हे विरोधी पक्षात असूनही खुप कामे केलेले आहेत परंतु कुठे ना कुठे कमी पडल्याने नागरिकांनी आपल्याला खुप उमेदीने निवडून दिले आहे आपण ती उमेद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्या तरी दिसत आहेत.... आणि ही उमेद नेहमीच कायम ठेवतील हीच अपेक्षा लिहीण्यात काही चुक झाल्यास क्षमस्व.....

आपला 

एक शुभचिंतक 

राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू 

इलेक्ट्रिकल ट्रैनंर,अराजकीय सामाजिक कार्यकर्ता 

अबचलनगर नांदेड 770006399*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या