🌟महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल : या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील हिंदू खाटीक समाजातील खाटीकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी आता मटण दुकानांना 'मल्हार प्रमाणपत्र' देण्याचा निर्धार जाहीर केला आहे. 'मल्हार सर्टिफिकेशन डॉटकॉम'च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटिकांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. 'मल्हार सर्टिफिकेशन' नसेल तिथे मांस खरेदी करू नका असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे यांनी याबाबत आपल्या सोशल मिडिया अकाऊंट 'एक्स'वर या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'मल्हार सर्टिफिकेशन डॉटकॉम' या निमित्ताने सुरू करण्यात आले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले आहे.या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांच्या या आवाहनानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.....
💫मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होणार :-
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा. किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये, असे आवाहन यानिमित्ताने करतो, असेही राणे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या