🌟गृहविभागाने उन्हाळा आणि पावसाळ्याच्या अडचणी लक्षात घेऊन भरती गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचा घेतला निर्णय🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून राज्यातील गृह विभागाने २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणाऱ्या १०,००० पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे मात्र सध्या तीव्र उन्हाळा आणि पावसाळ्याच्या अडचणी लक्षात घेऊन भरती गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. मागील भरतीवेळी पावसामुळे अनेक उमेदवारांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यंदा गणेशोत्सवानंतर मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाच्या भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील भरतीवेळी १७,४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज आले होते, त्यामुळे याहीवेळी मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. यावेळी राज्यभर एकाच वेळी मैदानी चाचणी होणार असून, १:१० या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील.
0 टिप्पण्या