🌟विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियुक्ती🌟
प्रतिनिधी
पाथरी - पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ मारोती उत्तमराव खेडेकर यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुका समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पाथरी तालुका व परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती बाबत महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष मा.आ. हरिभाऊ लहाने काका, महाविद्यालयाचे सचिव श्री कुणाल हरिभाऊ लहाने, महाविद्यालयाचे संचालक श्री संदीप हरिभाऊ लहाने, प्राचार्य डॉ राम फुन्ने, उपप्राचार्य डॉ सुरेश सामाले व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या