🌟नंदिग्राम ग्रह निर्माण सहकारी संस्थां च्या सभासदांना सोयी सुविधा पुरविणार.....!


🌟असे संस्थेचे नूतन अध्यक्ष दासराव पुयङ यांनी सांगितले आहे🌟


नांदेड :- नंदिग्राम गृहनिर्माण सहकारी संस्था ही नांदेड शहरातील जुनी व मोठी संस्था असून क्षेत्रफळाने 40 ते 45 एकर मध्ये नांदेड शहराच्या संस्था कार्यरत आहे. या संस्थेत जवळपास 590 सभासद असून यामध्ये काही जमिनीची तांत्रिक अडचणीमुळे सभासदांना  भूमाफिया कडून  त्रास होत आहे. तो  होणारा त्रास राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांना होणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या पुरेपूर प्रयत्न करणार व बिल्डर कडून अवैध बांधकाम करून संस्थेचे नियमाचे पायमल्ली करत आहे त्यांच्यावर ही नियमाप्रमाणे कङक कारवाई करणार येईल.

 संस्थेमधील रस्ते पाणी, वीज, मल निसारण (ड्रेनेज) इत्यादी विविध समस्याचे माननीय जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त यांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा निर्धार अध्यक्ष दासराव पुपयेड यांनी केला आहे. संस्थेतील गेल्या दहा वर्षातील आर्थिक गर्व्यवहार नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी पूर्ण लेखापरीक्षण करण्यात यावी अशी मागणी सहकारी उपनिबंधक यांच्याकडे करणार आहेत. सहकार कायदा 1960 व 1962 अंतर्गत संस्थेच्या माजी अध्यक्षांवर कलम 146 (बी) कायद्यान्वये उपनिबंधक कार्यालयात कारवाई चालू आहे. या कारवाईच्या पाठपुरावा करणार संस्थेतील यापुढे अवैध बांधकाम बिल्डर लॉबीला आळा घालणार यापुढे संस्थेच्या कारभार पारदर्शकपणे करण्यात येईल असे संस्थेचे नूतन अध्यक्ष दासराव पुयङ यांनी सांगितले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या