🌟मुंबईवर २६/११ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा🌟
न्यूयॉर्क : मुंबईवर २६/११ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राणा याच्यावर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. अमेरिकेत त्याच्यावर खटला चालवून शिक्षा झाल्यानंतर भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र, त्याने विविध कायदेशीर उपाय योजत प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयांनी यापूर्वीच भारताच्या बाजूने निर्णय दिला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळत प्रत्यार्पणाच्या निर्णयाला मान्यता दिली. आता लवकरच तहव्वूर राणाला भारतात आणले जाण्याची शक्यता असून, भारतात त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाईल.
💫भारतात छळ होण्याची तहव्वूर राणाने व्यक्त केली भीती :-
तहव्वू राणाने याचिकेत म्हटले आहे की, भारतात माझा छळ होण्याची शक्यता जास्त आहे कारण तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे. तो अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याला हृदयविकाराचा झटका, पार्किन्सन आणि संभाव्य मूत्राशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे. राणाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की तो खटल्याला सामोरे जाण्यासाठी जास्त काळ जगू शकणार नाही.
💫अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मान्यता :-
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राणाची पुनर्विचार याचिका २१ जानेवारी रोजी फेटाळली. त्यानंतर गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता देण्याची घोषणा केली होती.....
0 टिप्पण्या