🌟राज्य निवडणूक आयोग व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगर पालिका,नगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका मागील जवळपास चार वर्षांपासून रखडल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थावर एकहाती प्रशासकराज चालत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका केव्हा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास १०० दिवस आढावा आणि तयारीसाठी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वॉर्ड रचना, यादी तपासणी, हरकती मागवने, आरक्षण सोडत या बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतरच लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकी संदर्भात येत्या ४ मे रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच लागणार असल्याचे बोलले जात आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल लागल्यानंतर जवळपास १०० दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे.
💫स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का रखडल्या ?
महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली. त्यामुळे प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचा की निवडणूक आयोगाचा यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थांचा सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला होता. त्यावर देखील आक्षेप घेण्यात आला. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज संस्थामध्ये लागू करण्या संदर्भात वाद होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायलयाचा निकाल आला नाही, या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत......
0 टिप्पण्या