🌟भारतात लवकरच उपग्रहावरून इंटरनेट सेवा उपलब्ध होणार....!


🌟एअरटेल व एलॉन मस्क यांची कंपनी 'स्पेसएक्स'मध्ये करार झाला🌟

नवी दिल्ली : भारतात लवकरच उपग्रहावरून इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी भारती एअरटेल व एलॉन मस्क यांची कंपनी 'स्पेसएक्स'मध्ये करार झाला आहे. या करारांतर्गत स्पेसएक्स व एअरटेल उद्योग, शिक्षण संस्था, आरोग्य केंद्र, दुर्गम भाग आदी ठिकाणी स्टारलिंक सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. एअरटेलच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये स्टारलिंक तंत्रज्ञान सामावून घेण्याची शक्यता पाहिली जाईल. स्टारलिंक ही जगात सर्व वापरकर्त्यांना वेगवान इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीकडे ७हजारांहून अधिक उपग्रहांचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.

स्टारलिंक इंटरनेटच्या सहाय्याने स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडीओ कॉलिंग आरामात करता येते. दुर्गम भाग उपग्रहाच्या सहाय्याने वेगवान इंटरनेटने जोडले जाऊ शकतात. कंपनीतर्फे एक किट पुरवले जाते. त्यात राऊटर, केबल, माऊंटिंग ड्रायपॉड दिले जाते. हायस्पीड इंटरनेटसाठी डिशला मोकळ्या जागेत ठेवले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या