🌟प्राथमिक शाळा सकाळी ७ ते ११.१५ पर्यंत तर माध्यमिक शाळांची वेळ आता सकाळी ७ ते ११.४५ वाजेपर्यंत राहणार🌟
✍️ मोहन चौकेकर
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.प्रचंड कडकडीत उन्हामुळे त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळांच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सुर्यवंशी यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार आता शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार आहेत.
💫उन्हाळ्यातील अध्यापनाचे असे राहील नियोजन :-
(प्राथमिक शाळा)
नियोजन वेळ
परिपाठ सकाळी ७ ते ७.१५
तासिका-१ सकाळी ७.१५ ते ७.४५
तासिका-२ सकाळी ७.४५ ते ८.१५
तासिका-३ सकाळी ८.१५ ते ८.४५
तासिका-४ सकाळी ८.४५ ते ९.१५
भोजन सुट्टी सकाळी ९.१५ ते ९.४५
तासिका-५ सकाळी ९.४५ ते १०.१५
तासिका-६ सकाळी १०.१५ ते १०.४५
तासिका-७ सकाळी १०.४५ ते ११.१५
(माध्यमिक शाळा)
तासिका-८ सकाळी ११.१५ ते ११.४५
शाळा तथा मुख्याध्यापकांना 'या' सूचना कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत उष्णतेपासून बचाव कसा करायचा हे विद्यार्थ्यांना शिकवावे वर्गातील पंखे सुस्थितीत असावेत, विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर आणि स्थानिक फळे व भाज्या, हंगामी फळे खायला सांगणे पातळ,सैल, सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत; उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे
उन्हात बाहेर जाताना पायात चप्पल किंवा शूज असावेत, डोक्यावर छत्री, टोपी, टॉवेल, उपरणे असावे अशी असणार आता शाळा भरण्याचा व सुटण्याची वेळ प्राथमिक शाळा : सकाळी सात वाजता शाळा भरतील व शाळा सुटण्याची वेळ ११.१५ राहील माध्यमिक शाळा : सकाळी सात वाजता शाळा भरतील आणि ११.४५ वाजता सुटतील. प्रचंड कडकडीत उन्हामुळे सर्व शाळेमधील विद्यार्थी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यासंदर्भातील निवेदने शिक्षण संचालकांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या