🌟या दहशतवादी हल्ल्यामागे 'जैश उल फुरसान' या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची चर्चा🌟
पेशावर : पाकिस्तान मधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी घडविलेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या घटनेत १२ जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात चकमकही झाली. या दहशतवादी हल्ल्यामागे 'जैश उल फुरसान' या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची चर्चा आहे.
दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी दोन कारबॉम्बचा उपयोग केला. सुरक्षा दलांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे केले. दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कड्यावर हल्ला केला. हल्ला करणारे सहा ते सात दहशतवादी होते, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका महिला आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला होता. पॅरामिलिट्री फ्रंटियर कोअरवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला......
0 टिप्पण्या