🌟भारतीय नागरिकाची जॉर्डनच्या सैनिकांकडून गोळ्या घालून निर्घृण हत्या.....!


🌟अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या सूत्रांनी दिली आहे🌟

अम्मान : भारतीय नागरिकाकडून इस्त्रायलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जात असतांना जॉर्डनच्या सैनिकांनी त्याला गोळ्या घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. 

जॉर्डनच्या भारतीय दूतावासाने या भारतीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला आहे दूतावासाने सांगितले की, भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी आम्हाला मिळाली असून, आम्ही मृताच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत त्याचा मृतदेह भारतात नेण्यासाठी जॉर्डनच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या