🌟नांदेड येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलकांनी काढला महामोर्चा.....!


🌟महामोर्चात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून बौद्ध उपासक उपासिका भिक्खु संघाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती🌟


नांदेड
:- नांदेड येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलकांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या महामोर्चात नांदेडसह मराठवाड्यातून बौद्ध उपासक उपासिका भिक्खु संघाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी महाविहार आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच बिहार सरकार होश में आओ नितीश सरकारचा धिक्कार असो नहीं चलेगी नहीं बिहार सरकार की दादागिरी नहीं चलेगी बोधी गया महाविहार बौद्धाच्या ताब्यात द्या १९४९ चा टेम्पल ॲक्ट रद्द करा अशा घोषणांनी महामोर्चा दुपारी ०३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आज दुपारी १.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथुन सुरू झालेला मोर्चाला सुरुवात होऊन महात्मा फुले पुतळा शिवाजी नगर कलामंदीर मार्ग वजिराबाद शिवाजी पुतळा येथे विर्सजीत करण्यात आला भिक्खु संघ व सर्व आंबेडकर वादी पक्ष संघटनेचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी भिक्खु पंयाबोधी भन्ते पंयानंद भन्ते विनयप्रिय बोधी थेरो भन्ते शिलरल भन्ते संघप्रिय भंते संघपाल भन्ते सुभूती भन्ते पंयारत्न थेरो यांच्या सह सुरेश गायकवाड दिपक कदम किशोर भवरे बापुराव गजभारे विलास धबाले किशोर भवरे मनिष कावळे रमेश सोनाळे अविनाश भोसीकर शाम कांबळे इंजि प्रशांत इंगोले राहूल प्रधान प्रफुल्ल सावंत करूणा जमदाडे दादासाहेब शेळके दशरथ लोहबंदे विकास कदम विठल गायकवाड पिएस गाळे राजु लांडगे प्रसेनजित वाघमारे दामोधर सरकटे पिएम वाघमारे गणपत गायकवाड शंकर भंडारे रेखाताई पंडित सोनवणे शिवा भालेराव दिगंबर मोरे रमेश गोडबोले सुखदेव चिखलीकर भगवान ढगे सम्राट हटकर सुरेश हटकर सचिन सोनकांबळे यांच्या सह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सह लाखों बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते ठिकठिकाणी विविध संघटनानी थंड पेय पाणी फळ खिचडी वाटप करण्यात आली . शिवाजी महाराज पुतळ्या जवळ समारोपा भिक्खु संघानी त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या