🌟ग्राहककल्याण कार्यातून राष्ट्कल्याण साधावे -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

                        


🌟हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले🌟


हिंगोली(दि.20 मार्च2025) - ग्राहक कल्याणातून राष्ट्रकल्याण साधावे व त्यासाठी सर्वात अगोदर ग्राहकांनी कुठल्या मार्गाने न्याय मागावा ह्याच ज्ञान त्यांना  ग्राहक पंचायत महाराष्ट्र हिंगोली शाखेने सर्व संबंधितांच्या मदतीने द्यावे अशी अपेक्षा हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल ह्यांनी व्यक्त केली.हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व ग्राहक पंचायत महाराष्ट्र हिंगोली जिल्हा द्वारे आयोजित जागतिक ग्राहक दीन साजरा करताना बोलत होते. युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी ह्यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ ह्यांनी प्रास्ताविकातून ग्राहक दीन आणि ह्याबाबत जनजागृती बद्दलच महत्व आणि उपयोगिता विषद केली.जिल्हाधिकारी अभिनव गोयल ह्यांचा सत्कार ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे हिंगोली जिल्हाध्यक्ष अँड आर एन अग्रवाल ह्यांनी केलं.


यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सनदी लेखापाल महेश बियाणी ह्यांनी जुनी नवी पेन्शन बद्दल माहिती दिली.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व्ही.आर धबडे,सायबर सेल चे जिल्हा प्रमुख पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे ह्यांनी सायबर क्राईम अन् नागरिकांचे कर्तव्य व सुरक्षितता बाबत माहिती दिली व माहिती पत्रके वितरीत केली.मंचावर जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते,मानव अधिकार संरक्षण समिती जिल्हा कार्याध्यक्ष व ग्राहक पंचायत जिल्हा सहसचिव एम एम राऊत जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील,जिल्हाप्रसिध्दी प्रमुख डॉ.विजय निलावार,आदी उपस्थित होते. अँड आर एन अग्रवाल ह्यांनी हिंगोली जिल्हा ग्राहक पंचायत कडून दरवर्षी नुसार ह्या वर्षी देखील ग्राहक दीन साजरा करताना जिल्हाधिकारी अभिनव गोयल ह्यांनी ग्राहक माहिती पुस्तिका निर्मिती करावी अशी सूचना केली त्याचे स्वागत असून विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम हाती घेणार असल्याचं सांगितलं.राज्य शिक्षक पुरस्कारार्थी सौ.माधवीताई आसेगावकर व कु.स्वानंदी शेखर देशमुख ह्यांचा जिल्हाधिकारी गोयल ह्यांच्या हस्ते  उत्कृष्ट ग्राहक गीत व स्वागत गीत सादर केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन पत्रकार डॉ.विजय निलावार तर आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी  आप्पासाहेब गायकवाड ह्यांनी केलं.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल घुगे,सुभाष लदनिया,ऍड सय्यद  मुस्तफा,विजय घोडेकर, देवरत्न गव्हाणकर, जेठानंद नेंनवानी,अमजद बेग,अनिल घुगे,एस बी राजुलवार,उमेश तोषणीवाल भिकुलालजी बाहेती,डॉ शिवाजी गीते, हाजी शफी अहमद,चंद्रकांत कारभारी,जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व विविध कार्यालयातील स्टाफ,मुख्यालय तहसीलदार माने, अँड पवनकुमार भन्साळी,ऍड पार्वती पाटील,ऍड श्रीमती सावरगावकर,आदीनी परिश्रम केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या