🌟बिड जिल्ह्यातील अर्धमसल्यात जिलेटीनचा वापर करून दहशतवादी प्रवृत्तीच्या नराधमांनी घडवला धार्मिक स्थळात स्फोट..!


🌟गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस स्थानकात दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल : तीन तासात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात🌟 

बिड : बिड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील अर्थमसला गावात अमानुषतेचा कहर गाठत अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन मानवी रुपातील राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमांनी जातीवाचक शिवीगाळ करत जिलेटिनचा वापर करत पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या मस्जिदमध्ये ऐन रमजान महिन्यात स्फोट घडवून आणल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दि.३० मार्च २०२५ रोजी पहाटे ०२.०० वाजेच्या सुमारास ऐन गुढीपाडव्याच्या सनाच्या दिवशी घडवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे अमानवीय कृत्य केले.

दरम्यान याप्रकरणी दोन दहशतवादी प्रवृत्तीच्या आरोपीं विरोधात गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटने प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव विजय रामा गव्हाणे,श्रीराम अशोक सांगळे दोघे राहणार अर्थमसला तालुका गेवराई अशी आहेत या घटनेची माहिती समजताच बिड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सर्व यंत्रणा हलवत आरोपींना तात्काळ अटक करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रकरणामध्ये तत्परता दाखवली व प्रकरण यशस्वीपणे हाताळत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतली या घटनेनंतर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच येथील नागरिकांशी संवाद साधला. गुढीपाडवा व रमजान ईद हे दोन्ही उत्सव आपण एकोप्याने साजरे करूया असे आवाहनही यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले..

💫बिड जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी नागरिकांना केले शांततेचे आवाहन :-


अर्धमसला येथील दुर्दैवी घटनेनंतर बिड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कांवत म्हणाले की या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. आरोर्पीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन देखील पोलिस अधिक्षक यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या