🌟पुरस्कार दि. २३ मार्च रोजी कोलकाता येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार🌟
✍️ मोहन चौकेकर
कोलकाता : आपल्या संवैधानिक, सामाजिक, साहित्यिक व मानवीय सेवाभावी कार्यास्तव महाराष्ट्रंच नव्हे तर देशाच्या अनेक राज्यात तसेच अंतर्राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व सर्वांना सुपरिचित असलेले डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांना राममोहन विद्यासागर ॲकॅडेमी, वेस्ट बेंगाल, इंडिया च्या तर्फे 'इश्वरचंद्र विद्यासागर / राजा राममोहन रॉय ' हा बहुमानाचा पुरस्कार रोजी जाहीर झाला असून तसे सन्मान पत्र तथा सदर पुरस्कार दि. २३-०३-२०२५ रोजी कोलकाता येथे आयोजित समारंभात प्रदान होणार असल्याने तो स्विकारण्यासाठी सदर सोहळ्याचे निमंत्रण पत्र, त्यांना आदरपूर्वक देण्यात आले आहे.
त्याच बरोबर संस्थेच्या वतीने आयोजित नॅशनल पोयेट फेस्टिवल मधे प्रमुख अतिथी या नात्याने निमंत्रित सुध्दा करण्यात आले आहे. ॲड. कस्तुरे हे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील साहित्यिक क्षेत्रातील वैशिष्ठ्यपूर्ण लेखन, काव्य, शाहीरी, गीत, शायरी, गायन, अभिनय, दिग्दर्शन, कथा, पथनाट्य, वक्तृत्व इत्यादी साठी देशातील अनेक राज्यात प्रसिद्ध असून अंतर्राष्ट्रीय स्तरावरील साहित्यिक संमेलनात विविध पुरस्कारांनी सन्मानित तथा सामाजिक कार्यासाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट सुध्दा प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच विविध सामाजिक व साहित्यिक तथा सांस्कृतिक संस्था, मंडळे, विधायक संघटना आणि केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली, संविधान सन्मान परिषद, महाराष्ट्र, बहुजन साहित्य संघ, चिखली, संस्कार भारती अशा अनेक पातळींवर गेली अनेक दशके कार्यरत असून त्यांचे सर्व मित्रमंडळ , हितचिंतक व नागरिकांच्या, जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या