🌟विचारांची दंगल मेंदूत पेटविणारा दंगलकार कवी नितीनदादा चंदनशिवे.....!


🌟सांगलीतील कवठेमहांकाळ या गावामधून सुरू झालेला हा कवितेचा प्रवास थेट कुवेत,जपान,अमेरिका पर्यंत जाऊन धडकला🌟


✍️व्यक्ती आणि व्यक्तीमत्व लेखक : दिपक पुर्णेकर

आज बऱ्याच दिवसांनी लिहितोय. सकाळचे दहा वाजले होते. फेसबुकवर एक फोटो दिसला अन् कळले की आज दंगलकार नितीनदादा चंदनशिवे यांचा वाढदिवस आहे.!

 नितीनदादा यांच्या विषयी जेवढे लिहावे तेवढे कमीच पुरेसे शिक्षण नसतांनाही केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी साहित्य विश्वात आपला ठसा उमटवला आहे.मानवी मनांचा नेमका ठाव त्यांच्या लेखणीने घेतलेला दिसतो आहे.सांगलीतील कवठेमहांकाळ या गावामधून सुरू झालेला हा कवितेचा प्रवास थेट कुवेत, जपान, अमेरिका पर्यंत जाऊन धडकला. आपल्या अस्सल मराठी, अभिजात, विद्रोही शब्दाने त्यांनी इथल्या व्यवस्थेला उघडं-नागडं करून या व्यवस्थेचा बुरखा फाडण्याचे काम त्यांच्या लेखणीने केलेले आहे. आपला घरसंसार चालवत स्वतःमधील कवी जीवंत ठेवणे हे फार जिकरीचेच काम. दादांनी ते तितक्याच आत्मविश्वासाने पार पाडले आहे. पार पाडत आहेत.  कवी ,लेखक म्हटलं की केवळ कागदी घोडे नाचवणारा अशी एक सर्व सामान्य कल्पना बऱ्याच जणांच्या डोळ्यापुढे येते. पण हा कृतिशील, विवेकवादी कवी याला अपवाद आहे.कारण अंधश्रद्धा, देवदेवता यांच्यामध्ये आमच्या हजारो पिढ्या बरबाद झाल्या आहेत हे सांगण्यासाठी हा कवी आपल्या घरातील देव्हाराच पाण्यात विसर्जित करतो! अन् व्यवस्थेला ठणकावतो  की, आता पुरे झाले आम्हाला याची गरज नाही.

       २०२२ साली दादा व माझी पहिली भेट झाली. त्यावेळी ते माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी पुर्णेत आले होते. माझ्या 'कोलदांडा' या कथासंग्रहाला त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. हे मी माझे भाग्य समजतो.दादांचा चेहरा  दिसायला तसा तापटचं! पण आतून त्यांचे मनं हे अत्यंत संवेदनशील आहे.याचा अनुभव मला त्यावेळी आला होता. 

अशा संवेदनशील कवी, लेखकास वाढदिवसाच्या काळीजभर शुभेच्छा...

हे हास्य आपल्या चेहऱ्यावर कायम राहो.....दादा असेच लिहीत जा......गावो गाव, शहरो शहरी ,देश-विदेशी विचारांची दंगल पेटवित जा......पुनश्च एकदा वाढदिवसाच्या काळीजभरून शुभेच्छा...               

  शुभेच्छुक - दिपक पुर्णेकर

💐🎊🎂🎊🎁🎊💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या