मुंबई : महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवसांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही वाढला. हवामान विभागाने आज मंगळवार दि.०१ एप्रिल रोजी जळगाव,नाशिक,अहिल्यानगर,पुणे, छत्रपती संभाजीनगर,जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीटीचा इशारा दिला असून तर यावेळी सुसाट्याचा वाराही असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारी पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना तर गुरुवारी गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला. मराठवड्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी अवकाळीचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.......
0 टिप्पण्या