🌟राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुर्त बंद करणार नाही परंतु योजनेत मोठे बदल करणार....!


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा🌟

मुंबई :- राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुर्त बंद करणार नाही परंतु या योजनेत बदल करुन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोमवार दि.१७ मार्च रोजी विधानसभेत केली.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चिमटे काढले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार आणि शिंदे यांना आमच्या पक्षात या दोघांनाही मुख्यमंत्री करु अशी ऑफर दिली होती. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत उत्तर दिले. तुमच्याकडे इनमीन वीस टाळके आहेत तुम्हाला कसा पाठिंबा द्यावा असे प्रत्युत्तर दिले. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा सुरु आहे. यावर बोलतांना ना. पवार म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यावर थेट १५०० रुपयांची थेट रोख रक्कम टाकली जात आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने टाकले आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. दरेकर यांनी लाडकी बहिण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना मुंबई बँके मार्फत १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचाय त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू कारण, हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात येतील असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. या माध्यमातून लाडकी बहीण सक्षम होईल. तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. महसुली तुटी संदर्भातील टीकांना उत्तर देतांना ते म्हणाले की, ही तुट अर्थसंकल्पात दिसत असली तरी सातत्याने महसूली उत्पन्न वाढत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या