🌟पंजाबी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष मलकितसिंघ बल यांनी जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली मागणी🌟
नांदेड (दि.१० मार्च २०२५) - नांदेड शहरातील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्या विहार शाळेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे ही अतिशय गंभीर बाब असून या शाळेमध्ये प्रशासकीय व इतर अनियमितताची चौकशी करून संबंधित शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याची सुचना अल्पसंख्याक विकास विभागाचे महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष मलकितसिंघ बल यांनी जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नांदेड शहरातील कामठा खुर्द परिसरामध्ये मदर टेरेसा मिशनरीज कडून इंग्रजी माध्यमाची ज्ञानमाता विद्या विहार शाळा मागील 30 वर्षापासून आहे. शाळेच्या शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने या शाळेकडे सर्व समाजातील विद्यार्थ्यांचा ओढा असतो.सदर शाळा अल्पसंख्याक दर्जा असताना देखील इतर समाजाचे बहुसंख्य विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित आहेत.पालक विश्वासाने आपल्या बालकांना या शाळेमध्ये प्रवेश देतात परंतु या विश्वासाला तडा गेल्याची घटना गुरुवार दिनांक 6 मार्च रोजी घडली येथील एका दहा वर्षीय बालकावर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या शाळेच्या शैक्षणिक दर्जा चांगला असला तरी प्रशासकीय दृष्ट्या या शाळेमध्ये अनेक अनियमितता असल्याच्या शेकडो तक्रारी शिक्षण विभागामध्ये प्रलंबित आहेत. या शाळेबाबत भारतीय जनता मोर्चाचे अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्ष गुरुदीपसिंघ संधू यांनी तक्रार केली आहे. या तक्रारी संदर्भाने योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई होण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास विभागचे महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष मलकीतसिंघ यांना पाठपुरावा करण्याबद्दल विनंती केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत मलकितसिंघ बल यांनी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषद प्राथमिक चे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून कडक कायदेशीर करावी अशा सूचना दिल्या आहेत.....
0 टिप्पण्या