श्री हजूर साहेब नांदेड (दि.०५ मार्च २०२५) - श्री हजूर साहेब नांदेड शहरातील विविध परिसरात जवळपास सर्वच महापुरुषांचे स्मारक तसेच पुतळे उभारण्यात आले आहे. निश्चितच नांदेड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानस्पद बाब आहे परंतू तरुण पिढीला सातत्याने प्रखर देशभक्तीसह देशासाठी बलीदान देण्याची प्रेरणा देणारे महान शहीद क्रांतीकारी यांचे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने नांदेड महानगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पाऊल उचलली गेली नाही ही निश्चितच तमाम नांदेड वासीयांच्या दृष्टीने लज्जास्पद बाब असल्याने आज बुधवार दि.०५ मार्च २०२५ रोजी नांदेड महानगर पालिका आयुक्तांना बाबा फतेहसिंघ जी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महान क्रांतीकारी शहीद भगतसिंगजी,राजगुरुजी,सुखदेवजी यांच्या येणाऱ्या दिनांक २३ मार्च २०२५ रोजी असलेल्या शहीद दिनापुर्वी नांदेड महानगरपालिका हद्दीतील हिंगोली गेट रोड वरील उडाणपुल लगतच्या तीन मार्गावरील माता गुजरीजी कॉम्प्लेक्स समोरील जागा या महान शहीदांच्या स्मारकासाठी आरक्षित करुन या ठिकाणी शहीद भगतसिंग जी, राजगुरु जी, सुखदेव जी यांच्या प्रतिमा( पुतळा ) उभारण्यासाठी रितसर परवानगी द्यावी असे पत्र अतिरिक्त उपायुक्त गिरीश कदम यांच्याकडे सोपवण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी,बिरेंद्रसिंघ बेदी,भोलासिंघ गाडीवाले,जसपालसिंघलांगरी, प्रीतपालसिंघशाहू, दीपकसिंघ गल्लीवाले,अमोलकसिंघ गल्लीवाले, जसपालसिंघ लाखवाले, ॲड सुरेंद्रसिंघ लोणीवाले, जगजितसिंघ खालसा,जसबीर सिंघ हुंदल,गुरुप्रितसिंघ ग्रंथी,बक्षिसिंघ पुजारी,जगदीपसिंग मोहनसिंग नंबरदार यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे........
0 टिप्पण्या