🌟त्याबरोबरच १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने खा.राहुल गांधी यांना दिले🌟
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौ येथील न्यायालयामध्ये व्यक्तिगतरीत्या उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
लखनौ मधील न्यायालयाने खा.राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला असून ही रक्कम वादी पक्षाच्या वकिलांना देण्याचे आदेश दिले आहेत त्याबरोबरच १४ एप्रिल २०२५ रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने खा.गांधी यांना दिले आहेत. तसेच या तारखेला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोर्टाने दिला आहे.......
0 टिप्पण्या