🌟छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद परिसरातील औरंगजेबाची कबर हटवा....!


🌟अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे🌟

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद परिसरातील औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखे काहीही नाही त्यामुळे ती हटविण्यात यावी अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याचे निर्देश केंद्रीय पुरातत्त्व विभागाला देण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर पुरातत्त्व विभागाच्या यादीतून वगळली की राज्य सरकारने ती तिथून कायमची हटवून टाकावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या