🌟राजहंस सिंह यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे वेधले लक्ष🌟
मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईत लाखो गरीब व मध्यमवर्गीय वर्गासाठी रेशनिंगच्या निकषांत बदल करा, सर्वांना धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी किमान पाच लाखांपर्यंत उत्पन्न ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार राजहंस सिंह यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
मुंबईतील लाखो गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांच्या कुटुंबाची एकत्रित शिधापत्रिका आहे. त्यामुळे शिधावाटप विभाग यांच्या निकषाप्रमाणे केशरी कार्डसाठी किमान ५९ हजार रुपये आणि पांढरे रेशन कार्डसाठी किमान एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे. मात्र या निकषांमध्ये बदल करून किमान पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न ग्राह्य धरून सर्वांना रेशनिंगचे धान्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे या रेशनिंग प्रणालीत उत्पन्नाच्या निकषात तातडीने बदल करण्याची गरज असल्याचे राजहंस सिंह यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मत व्यक्त केले.
0 टिप्पण्या