🌟अध्यक्षपदी मनपा आयुक्त तर कार्यकारी अध्यक्षपदी करण गायकवाड व स्वागताध्यक्ष पदी नासेर खान यांची निवड🌟
परभणी :- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात साजरी व्हावी त्या निमित्ताने परभणी महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी यांची आज सोमवार दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव कार्यकारी अध्यक्षपदी करण गायकवाड व स्वागताध्यक्ष पदी नासेर खान यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी विनय ठाकूर, कोशाध्यक्ष पदी बशीर खान, सचिव पदी विश्वनाथ गोबाळे, सहसचिव पदी पुंडलिक मुजमुले, संघटक पदी सुनील भराडे, अभिजित कुलकर्णी व सदस्य पदी गौतम वाघमारे, न्यायरत्न घुगे, रोहित प्रधान, सौरभ सुर्यवंशी, राजू झोडपे, कागडा, विशाल उफाडे, आदींची निवड करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या