🌟संत श्री नामदेव महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज नांदेड विद्यापीठात विशेष व्याख्यान.....!


🌟यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड हे प्रमुख वक्ते असणार आहेत🌟

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा चे श्री गुरु गोबिंदसिंघ जी अध्यासन संकुल व नानक साई फाउंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संत श्री नामदेव जी महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर उद्या शुक्रवार दि.२१ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड हे प्रमुख वक्ते असणार आहेत. स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठ परिसरातील श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन संकुल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत श्री नामदेव महाराज यांचे लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर होत असलेल्या विशेष व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल संचालक डॉ. दीपक शिदे व नानक साई फाउंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या