🌟केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची 'चांद्रयान-५'ला मंजुरी : चंद्रावर २५० किलोचा रोवर उतरवणार....!


🌟असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही.नारायणन यांनी सांगितले🌟.

बंगळुरू : 'चांद्रयान-५' या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोतर्फे २५० किलोचा रोवर उतरवणार आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. 'चांद्रयान-५' या मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बंगळुरूत 'इस्रो'च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान-५ ला मंजुरी मिळाली आहे. यात जपानचे आपल्याला सहकार्य असेल. 'चांद्रयान-३'च्या मोहिमेसाठी २५ किलोचा रोवर नेला होता, तर 'चांद्रयान-५' मिशनसाठी २५० किलोचा रोवर नेला जाणार आहे.

२०२७ मध्ये 'चांद्रयान-४' मध्ये चंद्रावरील मातीचे नमुने आणले जाणार आहेत, तर 'गगनयान' सहित अनेक प्रकल्पांबरोबरच भारताचे स्वतःचे अंतराळ केंद्र उभारण्याच्या योजनांवर काम सुरू आहे.यंदा तीन अंतराळवीर अंतराळात जाणार यंदा गगनयानातून ३ दिवसांसाठी तीन अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेच्या ४०० किमी उंचीवर पाठवले जाईल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या