🌟राज्यातील दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात लवकरच नवीन योजना तयार केली जात आहे त्यातून दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होतील. ७० टक्के वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते सभागृहात उत्तर देत होते यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौरकृषी पंप योजना आपण सुरू केली. ८ वर्षात राज्यात १ लाख ८४ हजार पंप बसवण्यात आले. मागील १ वर्षात पावणे तीन लाख पंप बसवले गेलेत. २ लाख ७५ हजार कृषी पंपामुळे १४ लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत आपण देशात पहिल्या नंबरवर आहोत. १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांना १ हजार कोटीपेक्षा जास्त अनुदान देऊन रूफ सोलार योजनेचा लाभदिलेला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य नवीन योजना तयार करत आहे. आपल्याकडील घरगुती ग्राहकांच्या ७० टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट वीज वापरतात, त्यांच्यासाठी राज्याची योजना आम्ही करतोय. यामुळे हे ७० टक्के ग्राहक योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. ७० टक्के ग्राहक म्हणजेच जवळपास दीड कोटी ग्राहक पूर्णपणे वीजबिल मुक्त होतील असं त्यांनी सांगितले....
0 टिप्पण्या