🌟युवकांनी होळीसह धुलीवंदनाचा सन शिवीमुक्त व व्यसनमुक्त साजरा करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला🌟
परभणी (दि.१५ मार्च २०२५) : परभणी शहरातील जूना पेडगाव रस्त्यावरील प्रभाग क्रमांक १० मधील युवकांनी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवत होळीसह धुलीवंदनाचा सन शिवीमुक्त व व्यसनमुक्त साजरा करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
परभणी शहरातील जूना पेडगाव रस्त्यावरील सहकार नगर,प्रभावती नगर, मिसर नगर, महालक्ष्मी नगर या भागातील या युवकांनी यंदा होळी व धूळीवंदन हे दोन्ही सण आपआपसात एकमेकांच्या आई व बहिणीवर शिवीगाळ न करता शिवीमुक्त व व्यसनमुक्त साजरे करण्याचा संकल्प सोडला. त्याप्रमाणे या दोन्ही दिवशी येथील शेकडो युवकांनी होळी व रंगपंचमी मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करतेवेळी शिवीमुक्त व व्यसनमुक्त संकल्पना राबवली. रुपेश स्वामी, मंगेश सामाले, अंकुश नाईक, श्रीहरी महिंद्रकर, मयुर देशपांडे, आनंद जोशी यांच्यासह इतर युवकांनी यासाठी पाठपुरावा केला.
दरम्यान, या युवकांनी रंगपंचमीच्या दिवशी भारत माता की जय, हर हर महादेव, यळकोळ यळकोट जय मल्हार असा जयघोष करीत या भागातून फेरी काढली व त्याद्वारे रंगपंचमी व होळीच्या नागरीकांना शुभेच्छा दिल्या......
0 टिप्पण्या