🌟कठोर परिश्रमाने कोणतेही यश मिळविता येते - संजय पवार


🌟असे प्रतिपादन चंद्रपूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी केले🌟

पुर्णा (दि.११ मार्च २०२५) प्रतिनिधी - आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कठोर परिश्रमाने यश मिळविता येऊ शकते असे प्रतिपादन चंद्रपूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी केले.

ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि समुपदेशन कक्ष  व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावरील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करून आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे.आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून स्पर्धेच्या युगात आहे त्या साधनांमध्ये व कौशल्याच्या जोरावर जीवनाचे ध्येय गाठले तर निश्चितच आजची पिढी यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते तर प्रमुख उपस्थितीत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.भीमराव मानकरे, कार्यक्रमाच्या संयोजक प्रा वैशाली लोणे, प्राध्यापक डॉ. संजय कसाब, प्राध्यापक डॉ .प्रभाकर किर्तनकार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रतीक्षा मुळे यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला व्दितीय वर्षाची विद्यार्थीनी छकुली परडे यांनी केले तर आभार द्वितीय वर्षाची श्रुती नागरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या